Sunday, October 14, 2007

चंडिकादेवी(मंुबई)

चंडिकादेवी ही सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातीची ग्रामदेवता आहे. चंडिकादेवीची स्थापना सुमारे १५० वर्षांपूवीर् करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईच्या गव्हर्नरचं निवासस्थान याच परिसरात होतं. (आता त्या इमारतीमध्ये हाफकिन इन्स्टिट्युट आहे) गव्हर्नरनेही या देवळाच्या देखभालीसाठी ग्रामस्थांना काही निधी व जमीन देऊ केली. तिथे आज संस्थानचं कार्यालय व धर्मशाळा आहे. या सर्व मालमत्तेला ' श्री चंडिका संस्थान ' असं नाव प्राप्त झालं असं या देवस्थानचे एक विश्वस्त मनोहर नारायण पाटील सांगतात. ' नवसाला पावणारी देवी ' असा चंडिकादेवीचा लौकिक असल्याने चैत्र व अश्विानात उत्सवांदरम्यान इथे भाविकांची रीघ लागते.

No comments: