Saturday, October 9, 2010

JejuriGad

नाम जेजुरगड सुंदर जेथे नांदतो म्हाळसावर संगे भैरव अपार पूर्ण अवतार शिवाचा ll नील अश्वावरी स्वार हाती घेउनी तलवार करुनी मणीमल्ल संहार करी उद्धार जगाचा ll चंपाषष्ठीचा उत्सव भोर यात्रा भरती अपार येळकोट नामाचा गजर भक्त आनंदे करतिया ll दास म्हणेजी रामराव राम तोचि खंडेराव जेथे भाव तेथे देव लक्ष पाहि झटालीया ll --------
उपाध्ये गुरूजी. जेजुरी 

मराठी कुटुंबात शुभकार्य, लग्न, मुंज तसेच कुलधर्म व कुलाचार यांना महत्त्व असते. अनेक कुटुंबात मल्हारी - मार्तंडांच्या पूजनासोबत चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र उत्सव होत असतो. घरा-घरात पूजा केली जाते. महाराष्ट्रातील जेजुरी येथे खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे.
मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवचा (मार्तंड म्हणजे सूर्य व भैरव म्हणजे क्षेत्रपाल देवता) सुर्यासारखे तेज व भितीदायक रूप असा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मार्तंड भैरवचा अवतार घ्यावा लागला होता, असा उल्लेख पुराण ग्रंथामधून आढळतो. राक्षसांशी झालेलल्या युध्दात 'खंडा' नामक शस्त्राचा (तलवार) वापर करण्यात आल्याने खंडाधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड भैरव ओळखले जाऊ लागले.

खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत त्याला मैलार,मल्लप्पा,मल्लान्ना म्हंटल जात.सदानंदाचा येळकोट असा जयघोष केला जातो यातील येळ म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी, अशी मनीषा त्यामागे आहे. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पहिल्या पत्नीचे नाव म्हाळसा होते.म्हाळसा ही आदिमाया शक्तीचा अवतार मानला जातो. कर्नाटकमध्ये तिला माळज-माळची-माळवी-माळव असे म्हटले जाते. दुसरी पत्नी बाणाई धनगर होती जीला कन्नड़ मध्ये तुप्पद माळव असे म्हणतात. पुराणात ही जया नावाची पार्वतीची सखी म्हंटले आहे तर अख्यायिकेमध्ये गंगेचा अवतार समजले जाते.
प्रत्येक मराठी कुटुंबाचा कुलस्वामी हा खंडोबा असतो त्याचे कुलधर्म कुलाचार मराठी कुटुंब आनंदाने पर पाडतात.खंडोबा हे दैवत गोरगरीब ते श्रीमंत असा कोणताही भेद भाव न करता सर्वाना पूजनीय आहे कोणत्याही जाती धर्माच्या बंधनात अडकून न राहणारे असे दैवत आहे..
चंपाषष्ठीचे वेळी खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगे, गुळ, लसुण, कांद्याची पात, मेथी यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.



No comments: