Sunday, October 14, 2007

जरीमरी मता

आपल्या देशात प्रत्येक गाव हा देवीमातेचाच एक अवतार मानला जातो. देवीच्या या अवताराला उत्तरेकडे ' माताजी ' म्हणतात तर दक्षिणेत ' अम्मा '. आपल्याकडे ही देवी येते ' गावदेवी ' होऊन. या देवीच्या मूर्त स्वरुपात म्हणूनच बहुदा फक्त मुखवटा आणि हात दिसतात. अवघे गाव हे तिचे बाकीचे शरीर असते. म्हणूनच गावाला नाव मिळते ते त्या देवीचेच. जसे , चंडीवरून चंडीगड , कालीमातेवरून कोलकाता , श्यामलादेवीवरून शिमला , नैनादेवीवरून नैनीताल आणि ' मुंबादेवी ' वरून मुंबई!

गावाने या ग्रामदेवतेचा योग्य मान राखला नाही की ती ' मरीआई ' चा भयावह अवतार धारण करते. रोगराई आणते , मृत्यूचे तांडव मांडते , दुष्काळाने ग्रासते. ' जरी ' च्या अवतारात ती लहान मुलांना कांजिण्याच्या तापाने ग्रासते. मग देवीचा कोप थांबावा यासाठी गावातील पुरुष क्षमायाचना करतात , स्वत:ला शिक्षा करून घेतात. स्त्रिया देवीला शांत करण्यासाठी दही वाहतात. तिला बांगड्या , फुलांचे हार अशी सौभाग्यलेणी अर्पण करतात. देवी जेव्हा शांत होते तेव्हा तिला ' शितलादेवी ' म्हणतात.

देवीच्या ' जरी-मरी ' अवताराचे पुराणात वर्णन आढळते ते हे असे. पण मुंबईतील प्रमुख ' जरी-मरी ' मंदिरं मात्र या पुराणकथेशी नातं सांगताना दिसत नाहीत.
.................................
जरी मरी माता मंदिर , एस.व्ही. रोड , वांदे पश्चिम

वांद्याला एस.व्ही. रोडवरून लिकिंग रोडकडे जाताना तलावाच्या अगदी समोरच असलेले हे मंदिर सहज लक्ष वेधून घेते. मंदिरावरची ' जरी-मरी माता मंदिर ' पाटी दूरूनच वाचता येईल अशी. मंदिराने १९९६ सालीच त्रिशताब्दी महोत्सव साजरा केला आहे. म्हणजे मंदिर तब्बल ३१० वषेर् येथे उभे असून ' क्षत्रिय मराठा परीट ज्ञाति मंडळा ' च्या ताब्यात आहे. सध्या या मंडळाच्या श्ाी जरीमरी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी रमाकांत नारायण पुरारकर आहेत.

ट्रस्टच्या कार्यर्कत्यांनी दिलेल्या माहितीनुसार , तीनशेहून अधिक वर्षांपूवीर् वांद्याच्या या परिसरात परिटांची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. मंदिराच्या समोर आजही तलाव आहेच. पूवीर् मंदिराच्या मागील भागातही असाच तलाव होता. पण काळाच्या ओघात त्यात भराव घालण्यात येऊन आज तिथे इमारती उभ्या आहेत.

मंदिराची दंतकथा अशी सांगितली जाते की , तेथील एका शिळेवर एक गाय रोज पान्हा सोडायची. तिथेच मग गावकऱ्यांनी ' जरी-मरी ' चे अर्थात ' जगवणाऱ्या-तारणाऱ्या ' मातेचे मंदिर उभारले. ही ' जरी-मरी ' देवी ही वसोर्व्या नजीकच्या मढगावच्या हरबादेवी व हरडादेवी यांची धाकटी बहीण मानली जाते. त्यामुळेच आषाढात हरबादेवीच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी जरी-मरीची यात्रा असते. नवरात्रातही येथे नऊ दिवस जागरण-भजनकीर्तन , हळदीकुंकु आदी कार्यक्रम चालतात. गाडगेमहाराज पुण्यतिथीलाही येथे कार्यक्रम असतो. मार्गशीर्ष महिन्यात देवीची पालखी निघते. संपूर्ण वांदे परिसरात निघणाऱ्या या मिरवणुकीत दहा हजाराच्या आसपास लोक सहभागी होतात.

' जरी-मरी ' चे हे देवस्थान स्वयंभू व जागृत मानले जात असल्याने मोठ्या संख्येने येथे लोक नवस बोलण्यासाठी वा सुपारीचा कौल लावण्यासाठी येतात. पश्चिम उपनगरांच्या वाटेवर हे मंदिर असल्याने सिंधी , पंजाब्यांचीही इथे मोठी गदीर् दिसते.

No comments: