Tuesday, June 19, 2007

फादरस डे

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
"माफ करा"असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

"करा माफ"मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही वरवर

आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लाहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या एकाग्रतेचा भंग

"हो बाजूला"
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होवून
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
घेतली मी मनाशी

पाहता फूलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेवून ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात

आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गुन्हा
जावून त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता फूलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो ही भारावूनी
"घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो तुमच्याकडे
कारण आजच आहे फादरस डे"

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून
आवडशी तू मला
आणि तुझ्या त्या फूल देण्यामुळे
विशेषतः तुझे ते फूल निळे

No comments: