Tuesday, June 5, 2007

शून्याची महती
एकदां "दोन" म्हणे "एकाला"आहेच मी तुझ्या पेक्षा मोठालाऐकून हे वाटे "तीनाला"माहीत नाही का "एक" आणि "दोनाला"मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठला
दोन शिंगी "चार" होता आपल्या घरातहे संभाषण गेले त्याच्या कानातओरडून तो म्हणाला वरच्या आवाजातऐकल कारे "एक" "दोन" आणि "तिना""पांच" "सहा" "सात" "आठ"आणि मीनाकबूल झालो आहे "नऊना"तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे
"शून्य" बिचारा कोपऱ्यात होता बसूनऐकून सारे आले त्याला भरभरूनस्वतःशीच म्हणालाठाऊक नाही त्यांना माझी किंमतघेऊन मला शेजारी,जेव्हांएखादा दाखवील हिम्मतव्रुद्धी होईल त्याची कळत नकळत
सूर्य,चन्द्र,तारयांचा आहेमाझ्या सारखा आकारपण सांगतात का ते कधीआमचाच आहे सर्वांवर अधीकार
नको स्वतःची शेखी मिरवूंचढावर वरचढ असोतो छपूनकरा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळूनत्यामूळेघ्याल तुम्ही तुमची किंमत वाढऊनलागू नका भागाकार वावजाबाकीच्या नादालालागेल ग्रहण तुमच्या किंमतीला
"एकाने" केली तक्रार "शून्याकडे"नाही उपयोग माझाकरताना गुणाकार वा भागाकारत्यावर"शून्य"म्हणाला त्यालाकरशील तूं व्रुद्धी बेरीज करतानानंतर"शून्य"पुसतो "एकाला"आहे का माझा उपयोगबेरीज करतानाखोड मात्र मोडतो मीगुणाकार करताना
तात्पर्य काय?म्हणे "शून्य"ईतर आकड्याना"कमी लेखू नका कुणावेळ आली असताना"शून्यसम"आकडाहीहोत्याचे नव्हतेकरतो सर्वानाश्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

No comments: