Thursday, June 7, 2007

पानगळ

१.
झडत जाणा-या प्रत्येक पानांबरोबर
होणा-या वेदनेतच
पालवीची पहाट लपली होती.
पण
अस्तीत्वाचा संबध
पानांशी जोडणा-या झाडाला
मृत्युचे वेध लागले होते.

२.
रोजच्या रस्त्यावर
जाता येता दिसणारा गुलमोहोर,
आज नखशिखांत डवरलाय.
काल,
असेल का वाटली याला भिती,
आज गुलाब फुटण्याची

आणि तोही एखादाच!

No comments: