Sunday, October 14, 2007

महाकाली(मंुबई)

जोगेश्वरी उपनगराच्या मधोमध वसली आहे जोगेश्वरी देवी. महाकाली गुंफेत या देवीचं अतिशय संुदर असं प्राचीन मंदिर आहे. चहुबाजूंनी नवीन बांधकामाचा विळखा पडला असला तरी या मंदिराचं सौदर्यं अबाधित आहे. या मंदिरात प्रवेश करताच क्षणी पावित्र्य आणि मांगल्याने भारलेल्या वास्तूत प्रवेश केल्याचा अनुभव येतो. हजारो वर्षांपूवीर्च्या या गुंफांचं बांधकाम म्हणजे भारतीय भारतीय वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या गुंफेत जोगेश्वरी महाकाली देवीप्रमाणेच भगवान शंकर आणि श्रीगणेशाचीही मंदिरं आहेत. मंदिराच्या आत प्राचीन कोरीवकाम पाहायला मिळतं. न दुभंगणारी शांतता , प्रसन्न वातावरण अंतर्मुख करतं. भल्या मोठ्या कातळात ही गुंफा खोदलेली असल्यामुळे गुंफेच्या आत बारा महिने गारवा असतो. नवरात्रीच्या काळात या देवळात भक्तगणांची पहाटेपासून रीघ लागलेली असते. सुंदर नक्षीदार भव्य खांबावर तोललेलं हे देऊळ प्रेक्षणीय तर आहेच पण त्याचबरोबर ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारची प्राचीन मंदिरं मुंबईत आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उरली असल्याने जोगेश्वरीच्या या देवळाचं महत्त्व वेगळं आहे. सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं असताना या मंदिराचं पुरातन सौंदर्यं जपणं मुंबईकरांचं कर्तव्यच आहे.

No comments: