Sunday, October 14, 2007

जीवदानी(मंुबई)

महाराष्ट्रातील अठरा शक्तीपीठंापैकी विरारच्या जीवधन गडावरील या देवीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. गाईच्या रुपात प्रकट झालेल्या देवीने गडावरुन जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला जीवदानीचा डोंगर आणि तेथे वास्तव्य करणारी आदिमाता जीवदानी म्हणून प्रसिध्द झाली. पायथ्याशी गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करुन तिथे मूतीर् बसवण्यात आली आहे. या परिसरात अनेक पांडवकालीन गुंफा आहेत. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. शेजारीच मानकुं ड नावाची पाण्याची कुंडं आहेत. डोंगरावरुन खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहीण बारोंडा देवी आणि महादेवाचं मंदिर आहे. आता फनिक्युलर रोप रेलचा प्रकल्प लवकरच पूर्ण होत असल्याने गडावर जाणे सोपे होईल.

No comments: