Saturday, June 9, 2007

हा निरोप तरी कशाला ?

अरे.... आता निरोप घेतानाही
तुझ्या ओठावर मला भाळणारे
हे हासु तरी कशाला.......
आणि माझ्या डोळ्यात तुला न कळणारे
हे व्यर्थ आसु तरी कशाला.......?

कधी ऐकलंच नाहीस माझं...
आता तर कायमचं सोडुन जायच ठरवलचं आहेस
तर तुला मी समजवायचा प्रयत्न तरी कशाला.......?

निरर्थक होत्या ज्या...
त्या जुन्या गोष्टी आता आठवु तरी कशाला.......?
ज्या डोळ्यातले भावच जर तुला कधी कळले नाही
तर आता त्या डोळ्यात आसु साठवु तरी कशाला.......?

ऐकायलाच जर कोणी नाही
तर मनातल्या वेदनेला
वाचा फ़ोडु तरी कशाला.......?
सिगारेट पिताना त्याच्या
धुरातही तुच दिसतेस
मग मी ती ओढु तरी कशाला.......?

मैफ़िलीत बसल्यावर प्रत्येक घोटाला तुझीच आठवण
मग तो प्याला मी पिऊ तरी कशाला.......?
तुला हे वाचायलाच जर वेळ नाही
तर मग मी मनातलं लिहु तरी कशाला.......?

रोज तुझीच स्वप्न पाहायचो
तु स्वप्नात येशील म्हणुन लवकर निजायचो
ते तर आता फ़क्त स्वप्नंच राहिलय
मग कधी पुर्ण न होणारी स्वप्न आता मी बघु तरी कशाला....... ?

तुझ्यासाठीच जगेन आयुष्य्भर जगेन असे ठरलेल
आता तुच नाहिस तर
काय अर्थ अश्या जगण्याला ?
मग आता मी जगु तरी कशाला.......?

No comments: