Thursday, June 7, 2007

कॉर्नींगचे भांडे

इस्तमाल होना है तो
इन्तकाल होनाही है

कॉर्निगचे भांडे
हा तुझा "वीकपॉइंट" आहे
ते तुटल्यावर तुला
दुःख होणे सहाजीक आहे
तुझ्या दुःखात सहभागी न होणे
मला असंभव आहे

धगघगत्या वॉशर मधून
रखरखत्या ओव्हन मधून
खतखतत्या अन्ना मधून
ठेवून परत घेण्या मधून
घेवून परत ठेवण्या मधून
अपरिमीत शॉक मधून
"बचा तो सिकंदर
न बचा तो मुक्कद्दर"

सजीव असो वा निर्जीव
जनन मरणाचे तत्वज्ञान
एकच असते
इस्तमाल होजाय
तो इन्तकाल होनाई है
पण इथे आहे एक दिलासा
कॉर्नींगचे भांडे एकदीन
वालमार्टमे मिलनाही है

No comments: